प्राचीन भारतातील नाग
- Get link
- X
- Other Apps
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
प्राचीन भारतातील नाग
नागांचा इतिहास सिंधू संस्कृतीपासून आपणास मिळतो. सिंधू संस्कृतीवर नवा प्रकाश या लेखात (१९९२) श्री. के गोळेगावकर यांनी म्हटले आहे की "सिंधू संस्कृतीच्या मुद्रांमध्ये नागांच्या अनेक मुद्रा आहेत. ऋग्वेदातील ऋचेत अहिचा म्हणजे नागांचा उल्लेख आलेला आहे. दक्षिणेतील द्रविड या नावाने ओळखला जाणारा समाज हा मुख्यतः नागवंशीय असून त्यांच्यात अजूनही मातृसत्ताक कुटुंब पद्धती चालू आहे."
याचा अर्थ स्पष्ट आहे सिंधू संस्कृतीवर नागांचा मोठा प्रभाव होता.
वैदिक साहित्यात ही वैदिकांचे विरोधक म्हणून नाग आपणास पाहायला मिळतात.
ऋग्वेदात अहिवृत्र हा नाग वैदिकांचा सर्वात मोठा विरोधक म्हणून पहायला मिळतो. इंद्राने त्याची हत्या केली.
या अहिवृत्र ला मरण्यासाठी त्वष्टा याने वज्र तयार करून दिल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. या मोबदल्यात इंद्राने त्वष्ट्या च्या मुलाला त्रिशीर्षाला आपले पौराहित्य दिले.
महाभारताची सुरुवातच नागांना दिलेल्या शापवाणी वरून होते. महाभारतात अर्जुनाने खांडववन जाळल्याची कथा आलेली आहे. कृष्ण अर्जुनाने मोठी तयारी करून खांडव वन अग्निसात करण्याला सुरुवात केली. त्यावेळी नागांचा भयंकर संहार करण्यात आला. या भयंकर संहाराचे वर्णन महाभारताच्या २२८ व्या अध्यायात आले आहे. ते इतके भेसूर आहे की त्यासमोर महमूद गझनीच्या स्वार्यांचे वर्णनही फिके वाटावे. (धर्मानंद कोसंबी :- हिंदी संस्कृती आणि अहिंसा) या संहारातून तक्षक नागराजाचा पुत्र अश्वसेंन तोच काय तो बचावला.
एन के दत्त यांनी नमूद केले आहे की, महाभारत युद्धानंतर लवकरच नागलोकांनी तक्षशीला या प्रदेशावर आपला अधिकार प्रस्थापित केला. आणि या नागांनी हस्तिनापूर राज्य करीत असलेल्या पांडवांचा नातू परीक्षित दुसरा याच्यावर स्वारी केली त्यात परीक्षित मारला गेला त्याचा पुत्र जनमजेय तिसरा याच्या बरोबरही नागांचे युद्ध झाले परंतु तो नागांना नमोहरण करू शकला नाही. एकेकाळी हस्तिनापूरचे नाव हस्तिनागपूर होते हे डॉ जोतिप्रसाद जैन भारतीय इतिहास या ग्रॅंथात मांडतात.
कश्यपाला कदृपासून नाग पुत्र झाला त्याचे वंशज नागवंशी म्हटले गेले. इसपू ९ व्या शतकात पार्श्वनाथ होऊन गेला त्याचेही गोत्र कश्यप असल्याचे म्हटले आहे. तो नागवनशी होता. इस १०-११ व्या शतकातील अभिलेखात नागवनशी राज्यांनी कश्यप गोत्राचा वापर केल्याचे स्पष्ट होते. पंजाबातील मुलतान हे अनेक नावांनी ओळखले जाते परंतु त्याचे अगदी सुरुवातीचे नाव कश्यपपूर असल्याचे कनिंगहॅम यांनी म्हटलेलं आहे. कश्यपपुराची स्थापना कश्यपणेच केली होती. त्याच्या नंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र हिरण्यकश्यप त्यानंतर त्याचा पुत्र प्रल्हाद व नंतर त्याचा पुत्र बाण हे त्या राज्याचे वारसदार झाले.
डॉ. आह साळुंखें यांच्या बलिवंश या ग्रंथात ते म्हणतात "कदृने हजार पुत्र मागितले आणि विनिते ने त्या कदृच्या त्या पुत्रांपेक्षा श्रेष्ठ असे दोनच पुत्र मागितले हा कथा भाग आवर्जून वाचण्यासारखा आहे. नाग लोकांची संख्या मोठी असूनही कमी संख्येच्या वैदिकांनी त्यांचा पराभव केला हे क्लेशकारक सत्य यामध्ये स्पष्ट झाले आहे."
नाग अनार्य आहे स्पष्ट करताना आह साळुंखें म्हणतात. "याचा अर्थ मुळातच विनिता हे पात्र आर्य लोकांचे व कदृ हे पात्र अनार्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आणि जेव्हा या दोन समाजात संकर घडून आले तेव्हा हा बहिणी बहिणी मानण्याचा प्रकार कल्पिलेला आहे हे उघड आहे. "
डॉ. आह साळुंखें यांनी नागांना अनार्य मानलेल आहे. त्याचबरोबर त्यांची संख्या ही वैदिकांपेक्षा अनेक पट जास्त असल्याचं स्पष्ट केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्या अस्पृश्य मूळचे कोण या पुस्तकात म्हणतात "नाग लोक कोण होते ???? निसंशयपणे ते अनार्य होते."
ते आणखी पुढे म्हणतात "द्रविड आणि नाग ही एकाच वंशातील लोकांची नावे आहेत.....भारतातील द्रविड लोक आणि उत्तरेकडील असुर किंवा नाग लोक हे एकाच वंशातील लोक आहेत......लक्षात घेण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे तामिळ किन्वा द्राविड ही भाषा केवळ दक्षिण भारताची नसून आर्य येण्यापूर्वी संपूर्ण भारताची ती भाषा होती. आणि काश्मीर ते कन्या कुमारीपर्यंत ती बोलली जात होती. संपूर्ण भारतातील नाग लोकांची ती भाषा होती. अशी वस्तुस्थिती आहे. ....दास लोक म्हणजेच नाग लोक आणि नाग लोक म्हणजेच द्रविड लोक होत....भारतामध्ये जास्तीत जास्त दोनच वंशाचे लोक राहत आलेले आहेत ते वंश म्हणजे आर्य आणि नाग हे होतं."
"या द्रविड भाषा संस्कृतीच्या लोकांनाच वैदिक परंपरेतील साहित्यात दानव, दैत्य,असुर,दास ,नाग इत्यादी नावाने संबोधले आहे. त्यांना अनार्य म्हटले आहे. परंतु हे सर्व एकच लोक आहेत आणि हे सर्व नागवंशाचे लोक आहेत. द्रविड व नाग हे भिन्न वंशाचे लोक नाहींततर ही एकाच वंशाच्या लोकांची ही दोन वेगळी नावे आहेत. द्रविड हा शब्द मूळ नाही तामिळ चे हे संस्कृत रूप आहे. दमील्ल याचे द्रविड रूप बनले. (Bhandarkar lecture on ancient history of india)
परंतु द्रविड हे लोकांच्या वंशाचे निदर्शक नाही द्रविड हे त्यांचे भाषिक नाव आहे. तर नाग हे त्यांचे वांशिक सांस्कृतिक नाव आहे. (Dr. Ambedkr the untouchble p. 58)
आह साळुंखें भांडारकर व डॉ आंबेडकर यांच्या माहितीवरून हे स्पष्ट होते की आर्य येण्यापूर्वी येथे केवळ नाग लोक राहत होते. आर्य आले तरी नागांची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त होती.
अस मानलं जातं की आर्य राजा भरत याच्यावरून आपल्या देशाच नाव भारत असे पडले. अकेडीयन राजा पहिला सर्गन (इसपू २३३४-२२७९) यांच्या कोरीव लेखात तो अभिमानाने सांगतो की त्याच्या राजधानीच्या बंदरात मौल्यवान वस्तूंनी भरगच्च भरलेली जहाजे नांगर टाकून उभी आहेत. ती पूर्वेकडच्या तीन देशातील आहेत. त्यांची नावे अनुक्रमे डीलमून, मकन आणि मेलुहा अशी आहेत. त्यातील डीलमून म्हणजे बहरिन. मकन म्हणजे ओमान इराण बलुचिस्तानचा मकरान किनारा आणि मेलुहा म्हणजे भारत. मेलुहा म्हणजे प्राचीन भारत आता हे मान्य झाले आहे (कोणे एके काळी सिंधू संस्कृती - मधुकर केशव ढवळीकर)
मेलुहा > मेल्लख्ख (प्राकृत) > म्लेंच्छ (संस्कृत) (कोणे एके काळी सिंधू संस्कृती)
याचा अर्थ भारताच आद्यनाव हे नागांशी संबधित होते. कारण प्राचीन ग्रांथात नागांनाच म्लेंच्छ म्हटलं गेलेलं आहे.
असा हा नागवंशाचा इतिहास त्यांची सत्ता संपुष्टात येण्याची कारण म्हणजे. नाग हे मातृवंशक. आरयांची पितृसत्ताक व नागांची मातृवंशक पद्धती या दोन भिन्न संस्कृतया होत्या. यादोन्ही संस्कृतीच्या राहिलेल्या परस्पर सहअस्तित्व मूळे आणि सानिध्यामुळे नागांची मातूसत्ताक पद्धती काळानंतराने लयास गेली. परंतु ही प्रथा दक्षिण भारतातील लोकांत अद्याप मूळ धरून आहे. मध्य भारतातील व दक्षिणेतील नागांची राज्ये विलयास जाण्याचे प्रमुख कारण त्यांची मातृवंशक प्रथा हेच आहे. मध्य भारतातील भारशिव नाग साम्राज्याचा वारसा वाकाटक वंशाकडे आला तो या राज्याच्या नाग राजकन्येचा वाकाटक गौतमीपुत्र याचे बरोबर विवाह झाला म्हणून. (प्राचीन भारतातील नाग)
दास शूद्रांची गुलामगिरी या ग्रांथात शरद पाटील म्हणतात. "मातृवंशक दासप्रथाक सिंधू समाज पितृवांशिक आर्याकडून पराभूत होऊन दास्याच्या गर्तेत निःशेष झाल्यानंतर पाताळात ढकलल्या गेलेल्या असुर राजर्षी बळीप्रमाणे तो नरकात चिरस्थायी झाला. या अमानुष जगाचे उलटे प्रतिबिंब अमरकोषाने जतन करून ठेवले आहे. या रसाताळाला नाग लोक म्हणतात. भूमातेच्या उपसकांचा लोक. कारण नाग हे कदृची प्रजा असल्याचे सांगितले जाते. नाग लोकाला बळी सदम असेही म्हणतात असुर राजर्षी बळीचा निवास. या नरकाची सिंधू नदी आहे वैतरणी व मातृदेवता आहे नरक देवी वा निरुत्ति " (p.456)
नागवंशाचे लोक आपल्या नावामागे नाग, नाक ,नाय अशी बिरुदे वापरत. ऐतिहासिक काळात मगध राजा शिशुनाक राज्याचा वंशाला अशी बिरुदे पाहायला मिळतात.
महाराष्ट्र्र तर नागांचा मायदेश होता. श्रीधरवरमाचा इस सण ३६५ च्या एका लेखात सेनापती सत्य नाग आपणास महाराष्ट्रीन असल्याचे सांगतो. सातवाहन काळात या भूमीचा उल्लेख महान बौद्ध पंडित नागार्जुन च्या संदर्भात नागलोक म्हणून आल्याचे दिसून येते.
सातवाहनांच्या नावात सुद्धा नाक प्रत्यय लावल्याचे आढळून येते. त्यामुळे सातवाहन नागवनशी होते हे स्पष्ट आहे. पुढील काळात ही परंपरा महाराष्ट्री लोकांनी पाळलेली दिसत नाही. त्याच कारण आहे ते हे की महाराष्ट्र्र मधील तथाकथीत उचवर्णीय नाग संस्कृतीपासून दुरावले गेले व वैदिक संस्कृती त्यांनी स्वीकारली. म्हणून तथाकथीत खालच्या लोकातच नाक प्रत्यय व इतर परपरा पाळण्याची लक्षणे दिसत होती.
महारात ही उदाहरणे शेकडो हजारांवर मिळतील पण उच्च समजणार्या जातीत मिळत नाहीत. काही अल्प उदाहरणे मिळतात
याबाबत ह. वा करकरे मराठयांच्या इतिहास मध्ये म्हणतात "याच शब्दाचा वापर मराठा म्हणविणार्या लोकांमध्ये प्रचलित असल्याचे एका ऐतिहासिक उदाहरणावरून दिसून आले आहे." (P174)
ही उदाहरणे कमी होण्याची कारणे त्यांनी केलेला वैदिक संस्कृतीचा स्वीकार.
जी दैवते वेद पुराणात आढळतात ती नागांची नाहीत. जी नाही आढळत ती नागांची आहेत.
प्रत्येक ठिकाणी एक जागेवाला. जागेवाला म्हणजे जागेचा मूळ मालक हा नागसवरूपातच पुजला जातो. कारण ज्यांची मूळ जमीन आहे ते नाग आहेत. महाराष्ट्र्रातील व दक्षिण भारतातील सर्व प्रसिद्ध दैवते नाग स्वरूपात आढळतात.
जोतिबा हे दैवतही नाग स्वरूप आहे. शेषस्थ आणि पन्नगवाहन ही जोतीबाची दोन नावे त्याचे वाहन शेषनाग असल्याची धारणा स्पष्ट करतात. कुंडलिन हे त्याचे नाव नागरूपत्व जाहीर करतात.
रवळनाथचे वाहन कासव मानले जात असले तरी अश्व व सर्प हीच त्याची वाहने आहेत. जोगेश्वरी ही शेष कन्या आहे शेष पत्नीही आहे.
वारूळ आणि नाग हेच येथील मंदिरातील पुजाविषय आहेत. या प्रतिकांची पूजा सुब्रह्मण्य या नावाने केली जात आहे.
सुब्रह्मण्यम हे नाव सुब्बरमनी या मणीप्रवाल शैलीतील तामिळ कृत्रिम संस्कृतिकरन असून त्या शब्दाचा मुलार्थ नागमनी म्हणजे नागराज अथवा नागश्रेष्ठ असा आहे. सुब्बराज, सुब्बाराव, सुब्बालक्षमी (शुभलक्ष्मी) इत्यादी दक्षिण नावातील सुब्ब हा अंश नागर्थक आहे.
प्रख्यात क्षेत्रपाल देव मुरुगण ह्यालाही स्थानिक लोक नागरूपात श्रद्धेने पाहत आहेत.
मातंगीचे मूळ प्रतीक वारूळ आहे. वारुळाच्या स्वरूपातच रेणुका एलम्मा मातंगी यांची पूजा होते. गोमंतक व दक्षिण कोकण या भागात सांतेरी या नावाने ती पुजली जाते.. क्षेत्र देवता अशी वारूळ प्रतिकात पुजली जात असल्यामुळे मुरुगण, सुब्रमण्यम खंडोबा जोतिबा रवळनाथ हे देव नागरूप मानले गेले. जेजुरी येथील कऱहेकाठी असलेला आदिम मैलार) हे असेच वारुळस्थ नाग आहेत
म्हस्कोबा प्रामुख्याने धनगरांचा देव आहे. पाच फनांच्या नागाच्या स्वरूपात तो भक्तना दर्शन देतो.
विठोबा व व्यंकटेश हे विष्णुरुप बनलेले आहेत. परंतु खंडोबा व जोतिबा अद्यामी सांभाळून आहेत. महात्म्य कथाकारांनी त्यांना शिवावतार बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही मूर्ती विधानाच्या व उपासनेच्या बाबतीत त्यांनी सत्व मुळीच सोडले नाही. (लज्जागौरी - रा. ची. ढेरे)
तथागत बुद्धांचा महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थींची विभागणी राजगृह चे आजातशत्रू, वैशालीचे लीच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकपाचे बुली , पावाचे मल्ल, रामग्रामचे कोलीय आणि वेठद्वीपचे ब्राह्मण यांना देण्यात आले. या स्थळावर मूळ महास्तूपांची निर्मिती करण्यात आली.
८४ हजार स्तूप बांधत असताना जुन्या स्तुपातून बुद्ध अवशेष बाहेर काढत असतानाच रामग्राम येथील नागांनी त्याचा विरोध केला.
नागभूमीत तथागतांच्या महापरिनिर्वाण नंतर आणि मौर्य पूर्व काळात बुद्ध दंत अवशेषावर उभारलेला महास्तूप उघडकीस आला आहे. पवनी येथून त्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत. पवनी येथील स्तूपाच्या उत्खननात एक अत्यंत महत्वाचा वेदीकस्तंभ मिळाला आहे. ह्या दान स्तंभावर "नागस पचणीकायिकास " असा लेख कोरलेला आहे. पंचनिकाय म्हणजे पाच निकाया चा विद्वान असलेला नाग भिक्कु असावा आणि पवणीस्तुपाशी त्याचा संबंध असावा हे स्पष्ट होते.
महाराष्ट्र म्हणजे मल्लराष्ट्र. बुद्धकाळातच मल्ल हे बौद्ध झाले होते. ते नाग होते. म्हणून महाराष्ट्रातील बुद्ध नागार्जुनला नागार्जुन म्हणा अथवा मल्लिकार्जुन म्हणा ते दोन्ही नावे समान अर्थाची आहेत.
- Get link
- X
- Other Apps

सत्यशोधकाचे सत्यवचन🌷
उत्तर द्या