शंबुक हत्या आणि सितात्याग
- Get link
- X
- Other Apps
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८
शंबुक हत्या आणि सितात्याग
रामायणातील रामाच्या चरित्र वर्णनावरून अनेक परिवर्तन वादी लेखकांनी, विचारवंतानी रामावर टीका केलेली आहे. पेरियार यांच्या 'दि रामायणा ट्रू रिडींग' यांच्या ग्रंथाने अनेक विक्रम मोडीत काढले. त्यावेळच्या सनातन्यांनी त्यावेळी भरपूर विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'रिडल्स इन हिंदुईझम' विरुद्ध तर वादळच उठलं होतं. ते प्रामुख्याने बाबासाहेबानी राम व कृष्णाचं जे सत्य लोकांसमोर ठेवलं त्यामुळे. अर्थात यानंतर प्रतिगाम्यांपासून पुरोगाम्यांपर्यंत अनेकांनी यावर लेखन केलेलं आहे त्या आधीही होतं होत पण त्याची जास्त दखल कोण घेत नव्हतं. रिडल्स च्या वादळाने सर्वांचं लक्ष राम कृष्णाच्या चरित्राकडे वेधलं. मग कोणी राम व कृष्णाच्या समर्थनार्थ लेखन करू लागला. राम कृष्णावरचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करू लागला. तर कोणी राम कृष्णाच्या विरोधात लिहू लागला.
डॉ. साळुंखें राम कृष्णाचे समर्थक फार पूर्वीपासून आहेत ते त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. शिवाय त्यांनी शिवधर्म गाथेत रामाचा "प्रेरक महामानव" म्हणून स्वीकार केलेला आहे.(शंबुक हत्या सितात्याग प्रक्षिप्त P. 23) स्वाभाविकच या त्यांच्या प्रेरक महामानवावरील आरोपांच खंडन करण्याची त्यांची जबाबदारी बनते. आणि ती जबाबदारी "व्यवस्थित" पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी अनेक पुस्तकातून यावर लेखन केलेलं आहे. त्याचाच एक भाग शंबुक हत्या व सितात्याग प्रक्षिप्त हे पुस्तक.
डॉ. साळुंखें यांचं पाहिलंच पुस्तक असं असावं जे ३०-३२ पानात आटोपलेलं आहे. खरंतर रामावर इतके आरोप करण्यात आलेले आहेत की त्याचं स्पष्टीकरण करायला किमान १००-१५० पानांच ते पुस्तक लिहू शकले असते. पण सर्व आरोपांचा त्यांनी या पुस्तकात विचार केलेला नाही . कारण डॉ. साळुंखें यांच्या लेखी ते आरोप 'इतके' महत्वपूर्ण नाहीत की ज्याची दखल घेतली जावी.
'शंबुक हत्या व सितात्याग प्रक्षिप्त' या पुस्तकाच्या पानांची संख्या कमी असण्याचं हे एक कारण आहे. त्यांनी एकाच तर्कां मध्ये शंबुक वध व सीतेचा त्याग हे आरोप धुडकावून लावले आहेत. त्यामुळे त्यांनी फारशी मेहनत घेतलेली दिसत नाही. उरलेल्या भागात 'नेहमीप्रमाणे' तत्वज्ञान शिकवले आहे.
शंबुक हत्या व सीता त्याग प्रक्षिप्त आहे हे सांगण्यासाठी त्यांनी युद्धकांडचा नंतरचा कांड उत्तर कांड प्रक्षिप्त असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी युद्धकांडाच्या शेवटच्या १९ श्लोकांचा दाखला त्यांनी दिलेला आहे. ती श्लोक फळ निष्पत्तीची श्लोक आहेत म्हणून डॉ. साळुंखें त्यानंतरच काव्य प्रक्षिप्त असा 'तर्क' मांडतात
त्यांची मांडणी बहुतांशी 'तर्कांवर' आधारित असते हे त्यांचे इतर ग्रंथ वाचले तरी समजते. तर्कांना सुद्धा महत्व असतं हे कोणीही मान्यच करेल पण ते तर्क कुठल्याही मांडणीने ढासळणार नाही असे भक्कम तर्कच संशोधनात ग्राह्य धरले जातात. त्यातही त्यांनी याआधीचे मांडलेलं विविध पुस्तकातील तर्क व आता या पुस्तकातील तर्क वाचून संभ्रम निर्माण होतो. त्याची चर्चा आपण पुढे करूच.
त्यांच्या मांडणीतून प्रामुख्याने समोर आलेले व निर्माण झालेले मुद्दे पुढीलप्रमाणे
१. फलनिष्पत्ती चे श्लोक रामायण ग्रंथाच्या उत्तर कांडाच्या शेवटी का नाही ?
२ फलनिष्पत्ती ज्या वेळी युद्धकांडानंतर सांगितली गेली त्याअर्थी ग्रंथ तेथेच पूर्ण झाला होता ?
३ फलनिष्पत्ती नंतर उत्तरकांड आहे त्यावरून यातील सितात्याग व शंबुक वध प्रक्षिप्त असावेत ?
४ रामायण फक्त राम रावण युद्धापर्यंत सीमित आहे ?
या तर्कांवर कदाचित काहींचा विश्वास बसण्याची शक्यता आहे. तरीही फळनिष्पत्तीचे श्लोक कोणत्याही परिस्थितीत ग्रंथाच्या शेवटीच असायला हवे होते काय ?
सुरुवातीला हे लक्षात घ्यायला हवं की रामायण हे राम रावण या युद्धापूरताच सीमित नाही. रामचरित्रातील कोणतीही गोष्ट वाल्मीकीला अज्ञात राहणार नाही याचा अर्थ तो रामचारित्र रामाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मांडतोय. त्यामुळे रामायण युद्धानंतर संपते हा दावा चुकीचा ठरतो. दुसरी गोष्ट फलनिष्पत्ती ही आनंददायी बाब आहे. रामायणाचा शेवट फारच दुःखद आहे. अश्या या दुःखद घटनेनंतर आनंददायी फलनिष्पत्ती ची अपेक्षा करणं कोणालाही गैर वाटेल. स्वाभाविक चरित्र लेखकालाही ते त्या ठिकाणी देणं गैर वाटलं असावं व आरयांच्या दृष्टीने आनंदी क्षण म्हणजे रामाचा रावणावर विजय हा होता त्यामुळे त्याठिकाणी फलनिष्पत्ती श्लोक देणं लेखकाला योग्य वाटलं असावं.
आता डॉ. साळुंखें यांची राम-रावण या मुद्द्यावर मतं काय आहेत ते पहा. त्यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथात त्यांनी रावणाला मिथक म्हणून मांडलेलं आहे.(p.५५७) (पण त्याच वेळी ते रामाला ऐतिहासिकच म्हणतात बरं). त्या पुस्तकात रावणाबद्दल त्यांनी काहीच्या काही "तर्क-वितर्क" लढवले आहेत. ते मी येथे देत नाही ते आपणच पाहून घ्यावेत. पण महत्वाचं म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र या पुस्तकात रावणाला मिथक मानून सुद्धा पुन्हा 'सितात्याग व शबुक हत्या प्रक्षिप्त' या पुस्तकात मूळ रामायण राम रावण युद्धा पर्यंत होते असे मांडण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांच्याच म्हणण्यानुसार रावण हे मिथक असेल तर हाच काल्पनिक रावण ऐतिहासिक रामशी कसा लढू शकेल ? याचा अर्थ स्पष्ट आहे. रामावरील डाग कसेही खोडता येत असतील तर ते एकदा त्यानीच मिथक ठरवलेल्या रावणालाही ऐतिहासिक मानायलाही ते तयार आहेत.
डॉ. साळुंखें यांनी युद्ध कांडमध्ये आलेले श्लोक त्यांच्या पुस्तकात दिलेले आहेत त्यातील काही श्लोक आपण पाहू -
क्षत्रियांनी मस्तक झुकवून प्रणाम करून हे नेहमी ब्राह्मणांकडून ऐकावे (त्यांना) ऐश्वर्याचा आणि पुत्रांचा लाभ होईल यात संशय नाही ||११८||
हे सर्व रामायण नेहमी एकणार्यावर व पाठणकरणार्यावर राम सतत प्रसन्न राहतो तो सनातन विष्णू आहे||११९||
महाबाहु रघुश्रेष्ठ राम हा साक्षात आदीदेव आहे. तो हरी नारायण प्रभू आहे. लक्ष्मण हा शेष म्हटला जातो ||१२०||
अशा रीतीने पूर्वी घडलेले हे आख्यान तुमच्या दृष्टीने कल्याणकारक असो. त्याचे विश्वासपूर्वक कथन करा. विष्णूचे बळ वाढो ||१२१|| (या श्लोकांची भाषांतर स्वतः डॉ. साळुंखें यांनी दिलेली आहेत)
हे श्लोक पाहून काय वाटतं ? तर राम हा विष्णूचा अवतार, किंवा वैष्णव आहे. पण हे मत डॉ. साळुंखें यांना मान्य होईल काय ? त्यांच्या आधीची मांडणी त्याला मान्यता देईल काय ?
हे श्लोक त्यांनी या पुस्तकात तरी मूळ रामायणाचा भाग मानलेले आहेत. आता हे श्लोकच प्रक्षिप्त मानले तर त्यांचा सिद्धांतच कोसळतो त्यांच्या सिद्धांतानुसार श्लोकापुढील रामायण नंतर जोडलेल आहे असं तेच म्हणतात. पण हे श्लोक ही नंतर घुसडलेलं असतील तर त्यांच्याच तर्कांप्रमाणे ते उत्तर कांड मध्ये असायला हवे होते. पण ते श्लोक तर आहे युद्ध कांडात आणि त्याच्याच आधारावर ते उत्तर कांडाला प्रक्षिप्त म्हणतायेत. त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की हे मूळचे श्लोक म्हणून स्वीकारले तर राम वैष्णव ठरतो आणि मूळचे श्लोक नाही म्हटले तर त्यांचा उत्तर कांड प्रक्षिप्त असल्याचा सिद्धांतच कोसळतो. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा असा की हे श्लोक प्रक्षिप्त मानले तर लेखकाला ते शेवटी म्हणजे उत्तर कांडात सुद्धा टाकता आले असते आणि रामायनाबद्दल लोकांच्या (डॉ. साळुंखें यांच्या) मनात संशयही त्यामुळे निर्माण झाला नसता. पण ते श्लोक उत्तर कांडात नसण्याचे कारण स्पष्ट आहे रामायणाचा शेवट दुःखद आहे त्यामुळे तेथे आनंददायी फलनिष्पत्ती चे श्लोक लेखकाने दिलेले नाहीत. ते श्लोक आर्यांचा आनंदी भाग राम विजयाच्या ठिकाणी आहेत.
आता ही त्यांना धडपड का करावी लागतेय ते आपण समजू शकतो. त्यांना कसही करून रामावरचे आरोप खोडून काढायचे आहेत. ते बालकांडा ला सुद्धा प्रक्षिप्त मानतात त्याचं कारण राम जन्माची कथा होय. कारण काय तर या कथे मुळे बहुतांश क्षत्रियांचा अहंकार दुखावतो. स्वाभाविकच रामजन्म कथा ही खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. डॉ. साळुंखें सुद्धा त्याकाळातील घटनांना आताचे नैतिक अनैतिक मापदंड लावून बघतात. त्यातही राम त्यांच्यासाठी "महामानव" आहे म्हटल्यावर ते फारच भावनिक आहेत त्या बाबत. रामजन्मा सारख्या घटना महाभारतात कित्येक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचे उल्लेख सुद्धा डॉ. साळुंखें यांनी आपल्या महाभारतातील स्त्रिया या पुस्तकात केलेले आहेत. पण राम त्याना पूज्य असल्यामुळे रामाच्या बाबत ते असा स्टँड घेत नाहीत.
असो बालकांड प्राक्षिप्त मानत असताना ते अजून एक गोंधळ घालून त्याच कांडातील इतर संदर्भ इतर पुस्तकात देखील वापरतात.
रामायणाच मूळ दशरथ जातक आहे त्याचा विस्तारकरून वाल्मीकीनी रामायण लिहिले हे अगदी हास्यास्पद व तितकेच गंभीर मत ते मांडतात. बौद्ध जातक व रामाचा संबंध ते जोडू पाहतात. (बरं दशरथ जातकही ते संपूर्ण स्वीकारत नाहीत सोईचा तेवढा भाग स्वीकारतात. दशरथ जातकात राम व सीता भाऊ बहीण आहेत म्हणून) अर्थात वरील सर्व मांडणी त्यातील हेतू लक्षात आल्यावर याही मांडणीत त्यांचा हेतू लगेचच लक्षात येतो. जातक हे प्रबोधनासाठी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत हे कुणीही सांगेल. जातकात अश्याच अनेक प्राण्यांच्या कथा आलेल्या आहेत. रामाचा आणि बौद्धांचा काही संबंध नाही. डॉ. साळुंखें यांनी क्षत्रिय अहंकारा पायी रामाला पुरोगामी, महापुरुष, महामानव घोषित केले तरी बौद्ध धर्मियांना त्यात काहीच हरकत घेण्याचं कारण नाही पण रामाला बुद्धाचा पूर्वज म्हणून त्यांचा संबंध बौद्धांशी जोडून कृपया बुद्धाचा अपमान करू नका.
जाता जाता त्यांच्याच ग्रंथातील त्यांनाही लागू होणारी काही वाक्य देतो -
"परशुरामाचा गैरवाजवी गौरव करून समाजाला कोणता संदेश देऊ इच्छित आहात ? लोकांपुढे कोणता आदर्श ठेऊ पाहत आहात ? जुने काही जगवायचेच असेल, तर ते समाजबांधणीच्या दृष्टीने निकोप आहे की नाही ते जरा स्वताच्याच विवेकाला विचारायला हवे. कोणाच्याही अहंकारावर हे राष्ट्र उभे राहणार नाही."
(परशुराम या ठिकाणी नागांची,चार्वाकांची,एकलव्याची हत्या घडवणार्या, कृष्ण व राम यांना ठेवूनही आपण हे वाचू शकता)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा