मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत.

>> गोत्र –आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.
>> देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते. वृक्ष, पर्ण, फूल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
>> वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत.

१. सोमवंश २. सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे.

मराठा या शब्दाचे संस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा, महारथ, महारथी म्हणजे मराठा ऊर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यंत शौर्यशाली रणधुरंधर क्षत्रिय राजबिंडय़ा पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे –

एको दस सहस्रणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्धरथ: स्मृत:।

भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धय़ांबरोबर लढू शकतो, त्या रणधुरंधरासच मरहट मराठा म्हणतात. ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासंबंधाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे. हा या बाबीस सबळ पुरावा होय.

श्री वाल्मीकी रामायण –
अयोध्याकांड, सर्ग ५१ श्लोक ६ यात दशरथाला महाराष्ट्रे (महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे. तसेच इसवी सनापूर्वी ६व्या शतकात जैन लोकांच्या कृतांग सूत्र या भद्रबाहूने लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र शब्द आढळतो. या ग्रंथाच्या आधाराने दुस-या शामाचार्यानी लिहिलेल्या श्री प्रज्ञापना उपांग सूत्र यात महाराष्ट्र शब्द आढळतो. पश्चिम घाटात काल्र्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे. तेथील पाण्याच्या हौदावर महारथी साकोसिकी पुतसा! विष्णुदत्तसा देयाधमपोदी म्हणजे कौशिकपुत्र महारथी/महारठी/महारट्टी विष्णुदत्त याने हे बांधले असे लिहिले आहे आणि या लेण्याचा काळ इ. स. पूर्व ३०० वर्षाचा आहे. मगध देशावर नंदाचे राज्य असताना, म्हणजे सुमारे २३०० वर्षापूर्वी वररूची होऊन गेला. त्याच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथात शेषं महाराष्ट्रीवत असा उल्लेख आहे, यावरून महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.

९६ कुळी मराठा गोत्र

आडनाववंशगोत्रदेवक
अहिररावसूर्यभारद्वाजपंचपल्लव
आंग्रेचंद्र..गार्ग्य..पंचपल्लव
आंगणेचंद्रदुर्वासकळंब, केतकी, हळद, सोने
इंगळेचंद्रभारद्वाज,देव कमळ, साळुंखी पंख
कदमसूर्यभारद्वाज,कळंब, केतकी, हळद, सोने
काळेसूर्यभारद्वाजकळंब, केतकी, हळद, सोन, साळुंखी पंख
काकदेसूर्यकौंडिण्यकळंब, रुई, मोरवेल, सूर्यफूल
कोकाटेसूर्यकाश्यपकळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
खंडागळेसूर्यवसिष्ठकळंब, सूर्यफूल
खडतरेचंद्रलोमेशपंचपल्लव
खैरेचंद्रमरकडेयपंचपल्लव
गव्हाणेचंद्रकौशीकपंचपल्लव, साळुंखी पंख
गुजरसूर्यशौनकपंचपल्लव
गायकवाडचंद्र,गौतमपंचपल्लव, सूर्यफूल
घाटगेसूर्यकाश्यप,साळुंखी पंख, पंचपल्लव
चव्हाणसूर्यकाश्यप,कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई
चालुक्यचंद्रभारद्वाज,मांडव्य, उंबर, शंख
जगतापचंद्र,मांडव्य,पंचपल्लव, उंबर, वड, पिंपळ
जगदाळेचंद्र,कपिल,पंचपल्लव, धारेची तलवार
जगधनेचंद्र,कपिल,पंचपल्लव
जाधव, यादवचंद्रकौंडिण्य,अत्रि, कळंब, पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा
ठाकूरसूर्यकौशिक,पंचपल्लव
ढमालेसूर्यशौनल्यपंचपल्लव
ढमढरेसूर्यकाश्यपकळंब
ढवळेचंद्रभारद्वाज,उंबर, शंख, धारेची तलवार
ढेकळेचंद्रवत्सकळंब, पिंपळ, उंबर.
ढोणेसूर्यभारद्वाज,कळंब, केतकी, हळद, सोने..
तायडे (तावडे)सूर्य,विश्वामित्र,कळंब, हळद, ताडपल्लव
तावरे / तोवरसूर्यगार्ग्यउंबर
तेजेसूर्यकौंडिण्यकळंब, मोरवेल, रुई
थोरातसूर्यभारद्वाजकळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
थोटे (थिटे)सूर्यवसिष्ठकळंब, सुर्यफूल
दरबारेचंद्रकौशीकपंचपल्लव
दळवीसूर्यवसिष्ठकळंब, पंचपल्लव
दाभाडेसूर्यशौनल्यकळंब
धर्मराजसूर्यविश्वामित्र,पंचपल्लव
देवकातेचंद्रकौशीकपंचपल्लव
धायबरचंद्रभारद्वाजउंबर, शंख
धुमाळचंद्रदुर्वासहळद, आपटय़ाचे पान
नाईकचंद्रवसिष्ठ,दुर्वास नागवेल
नालिंबरेचंद्रभारद्वाजउंबर, शंख
निकमसूर्यपराशर,मान्यव्य, कळंब, उंबर, वेळू
निसाळसूर्यवाजपेयीपंचपल्लव
पवार (परमार)सूर्यवसिष्ठ,कळंब, धारेची तलवार
प्रतिहारसूर्यभारद्वाजकळंब, केतकी, हळद, सोने
पानसरेचंद्रकश्यपकळंब
पांढरेचंद्रलोमेशपंचपल्लव
पठारेसूर्यकाश्यपकळंब, केतकी, हळद, सोने, वासुंदीवेल
पालवेसूर्यभारद्वाजकळंब
पलांढसूर्यशौनल्यकळंब, पंचपल्लव
पिंगळेचंद्रभारद्वाजउंबर, शंख
पिसाळसूर्यकौशीकपंचपल्लव, वड
फडतरेचंद्रयाज्ञवल्क्यपंचपल्लव, साळुंखी पंख
फाळ्केचंद्रकौशीकपंचपल्लव
फाकडेसूर्यविश्वामित्रपंचपल्लव
फाटकचंद्रभारद्वाजकमळ
बागलसूर्यशौनककळंब, पंचपल्लव
बागवर-बांगरचंद्रभारद्वाजउंर्ब, शंख
बांडेसूर्यभारद्वाजकळंब, केतकी, हळद, सोने
बाबरसूर्यभारद्वाजकळंब, केतकी, हळद, सोने, साळुंखी पंख
भागवतसूर्यकाश्यपकळंब
भोसलेसुर्यकौशीकपंचपल्लव
भोवारेचंद्रकौशीकपंचपल्लव
भोगले (भोगते)सूर्यकौशीकपंचपल्लव
भोईटेसूर्यशौनकपंचपल्लव
मधुरेसूर्यविष्णूवृद्ध,पंचपल्लव, सूर्यफूल
मालपेचंद्रभारद्वाजउंबर, शंख
मानेचंद्रगार्ग्यशंख, गरुड पंख
मालुसरेसूर्यकाश्यपकळंब
महाडीकसूर्यमाल्यवंतकळंब, पिंपळ
म्हांबरेचंद्रअगस्तिकळंब, शमी
मुळीकसूर्यगौतमपंचपल्लव, सूर्यफूल
मोरे(मोर्य)चंद्रभारद्वाजमयूर पंख, ३६० दिवे
मोहीतेचंद्रगार्ग्यकळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
राठोडसूर्यकाश्यपसूर्यकांत
राष्ट्रकुटसूर्यकौशीकपंचपल्लव
राणेसूर्यजमदग्नीवड, सूर्यकांत
राऊतसूर्यजामदग्नीवड, सूर्यकांत, सूर्यफूल
रेणुसचंद्रविश्वामित्रपंचपल्लव
लाडचंद्रवसिष्ठवासुंदीवेल
वाघसूर्यवत्स,विश्वावसू कळंब, हळद, निकुंभ
विचारेसूर्यशौनकपंचपल्लव
शेलारसूर्यभारद्वाज,विश्वामित्र, कळंब, पंचपल्लव, कमळ
शंखपाळचंद्रगार्ग्यशंख
शिंदेसूर्यकौंडिण्यकळंब, रुई, मृत्ति, केचावेल, भोरवेल
शितोळेसूर्यकाश्यपवड, सूर्यकांत
शिर्केचंद्रशांडील्यकळंब, आपटय़ाचे पान
साळवेसूर्यकौंडिण्यकळंब, रुई, मोरवेल
सावंतचंद्रदुर्वासकमळ, कळंब, साळुंखी पंख
साळुंखेसूर्यभारद्वाजपंचपल्लव, साळुंखी पंख
सांबरेसूर्यमान्यव्यकळंब, हळद
सिसोदेसूर्यकौशीकपंचपल्लव
सुर्वेसूर्यवसिष्ठपंचपल्लव
हंडेसूर्यविष्णुवृद्धपंचपल्लव, सूर्यफूल
हरफळेचंद्रकौशीकपंचपल्लव
क्षिरसागरसूर्यवसिष्ठकळंब

Comments

Popular posts from this blog

The History of India

जरीआई – मरीआई