मुलनिवासीवाद आणि डॉ.आंबेडकरांचा सिद्धांत


शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

मुलनिवासीवाद आणि डॉ.आंबेडकरांचा सिद्धांत

विचारवंतान्मध्ये डॉ. आंबेडकरांच्या सिद्धांताबद्दल दोन मतप्रवाह आहेत एक  जे डॉ. आंबेडकरांच्या 1951 सालच्या भाषणाचा संदर्भ देउन आर्य बाहेरुन भारतात आले असे डॉ. आंबेडकरांचे मत होते असे सांगतात दुसरे असे की जे डॉ. आंबेडकरांच्या शुद्र पुर्वी कोण होते ? या ग्रंथाचा आधार देत आर्य भारतातीलच आहेत असे डॉ. आंबेडकरांचे मत होते असे मांडण्याचा प्रयत्न करतात

पहिले मत ठासुन मांडणारे मुलनिवासीवादी आहेत कारण त्यांच्या त्या मांडणीत डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा एक त्याना आधार सापडतो व त्याच बरोबर आंबेडकरी समाजाचा त्याना पाठिंबा मिळेल अशी निती त्यांच्या डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा आधार घेण्यात असते.

तर दुसरे मत मांडणारे मुलनिवासीवाद्यांच्या विरोधात आंबेडकरांचा ग्रंथ कोट करुन मत मांडत असतात ( खर तर त्यानीहि आंबेडकर निट वाचलेले नसतात )

तस बघायला गेल तर या दोघांची मत हि चुकीची  अर्धवट आहेत. हे आपण आंबेडकर निट वाचले तरी लक्षात येउ शकते.


 शुद्र पुर्वी कोण होते ? हा ग्रंथ आर्यांच स्थान नेमक कोणत हे शोधण्यासाठी लिहिलेला ग्रंथ नाहि त्यामुळे त्या ग्रंथात आर्य हे भारतीय आहेत हे जसे सांगितलेले नाहि तसेच भारताबाहेरुन आलेले आहेत असाही त्यात निष्कर्ष काढलेला नाहि.

आंबेडकरांच साहित्य संपुर्ण वाचल तर हे लक्षात येत कि आंबेडकरांच्या मते ऋग्वेद जिथे घडला तो भाग म्हणजे पश्चिम पंजाब आणि अफगाणिस्तानचा सिमेवरचा भाग होता. तस पाहायला गेल तर तो भारताबाहेरीलच ठरतो पण आंबेडकरांच्या सिद्धांतात त्यांच्या स्थानाला महत्व देण्यात आल नव्हत उलट त्यानी युरोपियन संशोधकांच्या आणि ब्राह्मणी संशोधकांच्या आर्य आक्रमण सिद्धांतांच पुर्णता खंडण केलेल आहे.

आंबेडकरानी शुद्र पुर्वी कोण होते ? हा ग्रंथ शुद्रांचा इतिहास म्हणुन लिहिला नव्हता तर शुद्रांची बंधने, निर्बंध ( कायदे ) कसे निर्माण झाले याचा शोध घेण्यासाठी लिहिलेला ग्रंथ होता. आणि इतकी साधी गोष्ट दोंन्ही मत मांडणार्याना समजु नये याचच आश्चर्य वाटते. सामान्य वाचकांबद्दल आपण एकवेळ समजु शकतो पण अभ्यासकांच्या बाबतीत अशी चुक होइल अस वाटल नव्हत पण बर्याच अभ्यासकाना तो ग्रंथच समजलेला नाहि असे खेदाने म्हणावस वाटते . वर्षभरापुर्वी  एक शैव सिद्धांत मांडणार्या  आभ्यासका सोबत या विषयी चर्चा झाली तेव्हाही असाच अनुभव आला त्याना तो ग्रंथच बरोबर कळला नव्हता.

प्रख्यात इतिहास संशोधक कॉम्रेड शरद पाटील यानी आंबेडकरांच्या शुद्र पुर्वी कोण होते ? या ग्रंथाचा अर्थ (खंड 1: भाग 1) मध्ये जो लावला तो एकदम अचुक होता पण त्याकडे लोकांच का लक्ष गेल नाहि हेच समजण्यासारख नाही.

काही मोजके विचारवंत सोडले तर बहुतेकाना आंबेडकरांचा सिद्धांतच समजला नाहि असे खेदाने म्हणाव लागत

असो आंबेडकरांचा सिद्धांत त्यांच्याच भाषेत आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात....

काहि जण असे म्हणु शकतील की आंबेडकरांच संपुर्ण साहित्य वाचल्यावर त्यांचा सिद्धांत समजु शकत असेल तर हा खटाटोप आपण का करत आहात. तर त्याच कारण हे की बहुतेक जण संपुर्ण ग्रंथ वाचुन नेमका सिद्धांत काय आहे हे समजुन घेत नाही व दुसरे अस की काही महत्वपुर्ण मुद्दे असे आहेत की जे नजरेतुन सुटले तर पुर्ण सिद्धांताचा अर्थच बदलतो आणि मुख्यता हिच गोष्ट बहुतेक वाचकांसोबत घडली आहे.

मी पुर्णता बरोबर आहे हे मी ठरवत नाहि मी फक्त जे मुद्दे आपणासमोर ठेवणार आहे त्याचा फक्त आपण विचार करावा.

आंबेडकर शुद्र पुर्वी कोण होते या ग्रंथात खालिल निष्कर्ष काढतात

1) सुर्य वंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शुद्र होते

2) एक काळ असा होता की ज्यावेळी आर्य समाज फक्त तीन वर्ण म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मानीत होता

3) शुद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता. हिंदी-आर्य समाजातील क्षत्रिय वर्णाचाच एक भाग असा शुद्रांचा दर्जा होता

4) राजे आणि ब्राह्मण यांच्या मध्ये एकसारखे झगडे चालु असत या झगड्यान्मुळे ब्राह्मणांवर अनेक अत्याचार आणि अपमानस्पद दुराचार करण्यात आले

5) शुद्रानी आपल्यावर अत्याचार व जुलुम केले ही जाणीव ब्राह्मणांच्या अंतकरणाला एकसारख्या टोचण्या देत होती. म्हणुन ब्राह्मण शुद्रांचा द्वेष करु लागले व त्यानी शुद्रांचे उपनयन करण्याचे नकारले

6) शुद्राना उपनयन नाकारल्यामुळे शुद्र आपल्या मुळच्या क्षत्रिय पदापासुन च्युत झाले व सामाजिक दृष्टीने त्यांची अधोगती झाली. त्यामुळे त्यांचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला आणि या प्रमाणे त्यांचा स्वतंत्र चवथा वर्ण उपस्थित करण्यात आला.

वरील आंबेडकरानी काढलेले निष्कर्ष बरोबर की चुक हा वादाचा विषय असु शकेल. चर्चेमुळे व अधिक संशोधनामुळे त्यात काही बदल ही घडुन येतील. आंबेडकरसुद्धा विचार प्रवाहित ठेवण्यच्या वृत्तीचे होते व आपण हि नविन संशोधनाच स्वागतच केल पाहिजे  पण आजपर्यंत तरी मला पटेल असे आंबेडकरांच्या संशोधनाला तोड म्हणुन संशोधन वाचायला मिळाले नाहि ( असल्यास कळवावे त्यांच स्वागत करण्यात येइल ) . मी असे म्हणत नाहि की शुद्र पुर्वि कोण होते ? हा ग्रंथ 100% अचुक आहे तर असे म्हणतोय की त्यातले विक मुद्दे जरी आपण दर्शिविले तरी त्यांच्या मुळ सिद्धांताला कोणतीच बाधा आलेली नाही.

असो आपला विषय त्यांच संशोधन किती चुक कीती बरोबर हा नसुन मुळात त्यांच्या सिद्धांत नेमका काय आहे हे सांगण आहे

वर काढलेले निष्कर्श आंबेडकरनी संशोधना अंती काढ्ले होते पण सामान्या वाचकानी त्यांच्या ग्रंथामधल्या त्याच निष्कर्षावर जोर दिला इतर ग्रंथातील त्यांचे महत्वाचे मुद्दे वाचकांच्या नजरेतुन सुटले. म्हणुनच त्यांच्या निष्कर्षाचा अर्थ समजण्यात वाचकांची चुक झाली.

जे महत्वाचे मुद्दे वाचकांच्या नजरेतुन सुटले व त्यामुळे त्यांच्या त्या ग्रंथाचा अर्थच बदलला गेला ते नेमके कोणते मुद्दे होते ते पाहु

1) शुद्रांच्या प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या प्रश्नाचा मध्यवर्ती बिंदु शुद्र लोक होत नाहित तर त्यांच्यावर ज्या देहदंडाची व निर्बंधांची  कायदेशीर पद्धत लादण्यात आली आहे ती पद्धत त्या प्रश्नाचा मध्यबिंदु ठरते

(हा मुद्दा मी वरसुद्धा सांगितला होता. म्हणजेच या ग्रंथाची निर्मीती शुद्रांचा इतिहास सांगण्यासाठी झाली नसुन त्यांची बंधने व कायदे कसे निर्माण झाले याचा शोध घेणे यासठी झाली होती )

2)प्रस्तुत काळचे शुद्र लोक म्हणजे परस्परांपासुन भिन्न असलेल्या वंशामधुन उत्पन्न झालेल्या जातीचा समुह असले हे शुद्र लोक व हिंदी आर्य समाजातील मुळचे शुद्र लोक हे वांशिक दृष्टीने परस्परांपासुन अगदी वेगवेगळे आहेत

3)हिंदी- आर्य समाजातील शुद्रांच्या जीवनाची दोरी आपल्या हातात ठेवण्याची ब्राह्मणानी ही देहदंडाची व निर्बंधाची पद्धत प्रथमता तयार केली याबद्द्ल संशय नाही. स्वतंत्र , वेगळी आणि सहज ओळखता येइल अशी जमात करुन हे मुळचे शुद्र लोक आता राहत नाहित ते वरीष्ठ जातीत इतके मिसळुन गेले आहेत की त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मागमुसही लागत नाहि.

4) परंतु विशेष नवलाची गोष्ट ही की मुळच्या शुद्रांसाठी जे कायदे कानुन केले होते. ते कायदे कानुन मुळचे शुद्र अस्तित्वात राहिले नाहि तरी अस्तित्वात राहिले व मुळच्या शुद्रांशी ज्याचा कसलाही संबंध नाहि अश्या हिंदु समाजातील सर्व कनिष्ट दर्जाच्या लोकाना सध्या ते कायदे कानुन लागु करण्यात आले

5) हल्लीच्या काळचे शुद्र हे पुर्विच्या काळचे शुद्रापैकी नाहित.एवढी गोष्ट मात्र नक्की मुळच्या अपराध्यांसाठी जे कायदे कानुन केले होते ते आजच्या निरपराध लोकाना लागु करण्यात आले

(प्रस्तावना 10 ऑक्टोबर 1946)

(अधिक माहिती साठी शुद्र पुर्वी कोण होते ? या ग्रंथाची आंबेडकरानी लिहिलेली प्रस्तावना निट वाचा )

पहिल्या मुद्द्याच स्पष्टीकरण वरच दिलेले आहे बाकि मुद्दे वाचल तरी लक्षात येत की हिंदु समाजातील आताचे शुद्र ज्यांची लोकसंख्या ७५% आहे ते हिंदि - आर्य समाजातील शुद्रापेक्षा भिन्न आहेत

हिंदि आर्य समाजातील शुद्रांसाठी जे नियम बनवले गेल ते कालांतराने हिंदु समाजातील शुद्राना लागु करण्यात आले आणि त्या नियमांच्या निर्मितीचा शोध म्हणजे आंबेडकरांचा शुद्र पुर्वी कोण होते ? हा  ग्रंथ.

ह्या ग्रंथात आंबेडकर शुद्र हे नाव विशेषण म्हणुन आलेले नसुन ते एका टोळीच नाव होते आणि ती टोळी विंध्यपर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशात राहत असे विष्णु पुराण मार्कंडेय आणि ब्राह्मपुराण याचा दाखला देत मांडतात

आपल्या ग्रंथाच्या 11 व्या प्रकरणात समेटाच्या वृत्तांतच्या चौथ्या भागात ते म्हणतात -

शुद्र या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या काळी काय होता याबद्दल पुरा उमज न पडल्यामुळे वरील प्रकारचा गोंधळ उत्पन्न झाला आहे. हिंदी - आर्यांच्या काळी हा शब्द एका जमातीचे नाव होते. त्या जमातीचे जे लोक होते त्याचे नाव शुद्र असे मानले जात होते.आजच्या हिंदु समाजात शुद्र शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या अर्थाने तो विशेषनाम होत नाही. कनिष्ट दर्जाच्या व असंस्कृत स्थितीत राहणार्या माणसाच्या वर्गाचे विशेषण म्हणुन तो शब्द आज वापरला जातो. निरनिराळ्या प्रकारच्या व परस्परांपासुन भिन्न असलेल्या टोळ्या व जमाती यांचे जे वर्ग आहेत ते मिळुन जो समाज जो बनला आहे त्या समाजाला उद्देशुन शुद्र हा शब्द सध्या वापरण्यात येतो ..........( माहितीसाठी अधिक वाचा )

हिंदि आर्य समाजाचे शुद्र आणि हिंदु समाजाचे शुद्र हे दोन निरनिराळे व परस्परांपासुन भिन्न स्वरुपाचे लोक आहेत हे सत्य आहे याची जाणीव एकेकाळी धर्मशास्त्रकारांच्या मनाला होती हे उघड आहे. सत्छुद्र आणि असत्छुद्र या दोन वर्गामध्ये व अनिरवासित आणि निरवासित शुद्र या दोन वर्गामध्ये शास्त्रकारानी जो भेद केला आहे त्यावरुन या गोष्टीची सत्यता पटते  ( अधिक वाचा )

हे मुद्दे जर आपण पुर्णपणे वाचले तर आपणास हे कळुन येइल की आंबेडकरांच्या सिद्धांता चा नेमका अर्थ काय ? त्यामुळे आर्य बाहेरुन आले काय कींवा भारतात निर्माण झाले काय याच कोणतही उत्तर देण्याच आंबेडकरानी टाळलेल आहे. आंबेडकराच्या इतर साहित्य आणि भाषणांवरुन अस समजते की ते आर्यांचे वेद निर्माण झालेल स्थान पश्चिम पंजाब आणि अफगाणिस्तानचा सिमा मानत असले तरी त्यानी आर्य आक्रमणाची थिअरी फेटाळुन लावली त्यानी हा धर्म प्रचारातुन पुर्ण भारतात पसरला हे मानलेल दिसते.
मुळ वैदिक धर्म आणि ब्राह्मणी धर्म वेगवेगळा होता ( वेदामध्ये मानसाच्या प्रगतीशील जिवनासाठी काहिहि नाहि तो अदिम टोळ्यांचा धर्म होता ) असेच आंबेडकरांच मत होते. हजारोंच्या संख्येने अवैदिकानी या धर्मात प्रवेश केला आणि म्हणुनच नंतर निर्माण झालेल्या ब्राह्मणी धर्माला वैदिक आणि अवैदिक तेवढेच जबाबदार राहतात कारण या धर्माची निर्मितीच मुळात वैदिक आणि अवैदिक लोकांच्या पुरोहितवादामुळे ( आपल वर्चस्व व विशेष हक्कांच  संरक्षण करण्याचा हेतुने )झालेली आहे आज त्याच स्वरुप थोड्याफार फरकाने बदललेल आहे आणि या वर्चस्व वादालाच फुले- शाहु - आंबेडकरी विचार धारेचा विरोध आहे

1 टिप्पणी:

  1. मग आर्यांतील परस्पर झगडा हे स्वतंत्र प्रकरण कोणत्या अर्थाने लिहिण्यात आलं आहे

    उत्तर द्या

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई