पंढरीनाथ

पंढरपूर - विकिपीडिया

हा लेख पंढरपूर शहराविषयी आहे. पंढरपूर तालुक्याच्या माहितीसाठी पहा, पंढरपूर तालुका

{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूरहे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. पंढरपूर या क्षेत्राचे प्राचीन कन्नड नाव 'पंडरगे' असे आहे.[१]

  ?पंढरपूर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
नामदेव पायरी
नामदेव पायरी

१७° ४१′ ३९.१२″ N, ७५° १९′ ४९.०८″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
१,३०३.६ चौ. किमी
• ४६५.१२ मी
जिल्हासोलापूर
तालुका/केपंढरपूर
लोकसंख्या
• घनता
लिंग गुणोत्तर
४,०२,७०७ (२००१)
• ३०९/किमी
९१७ /

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात. [२].हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत









Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई