रोहित वेमुला


बुधवार, १७ जानेवारी, २०१८

रोहित वेमुला

                        


                    
  १ रोहितने विद्यापीठाच्या कुलगुरूंना लिहिलेलं पत्र -


                                                                                                                              १८ डिसेंबर २०१५
सर,
    
      सर्वात आधी मी आपलं कौतुक करतो, तुमच्या या भूमिकेबद्दल जी तुम्ही हैदराबाद कँपसमध्ये, दलित स्वाभिमान आंदोलनावर घेतली आहे. जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षाला, दलितांविषयी असभ्य प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुमचा त्या विषयातील रस ऐतिहासिक असतो, पाच दलित मुलांचा बहिष्कार केला जातो, कॅम्पसमध्ये.

       तुम्ही तर डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा लिलीपुट सिद्ध कराल. तुमची बांधिलकी पाहून. मी तुम्हाला दोन सल्ले देऊ इच्छितो, एकदमच 'घिसा-पिटा' सारखा.

       प्लीज, जेव्हा दलित विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होत असेल, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना दहा मिलिग्राम सोडियम आजायड द्या. या इशार्यावर की, जेव्हा ही त्यांना आंबेडकर वाचण्याची इच्छा होईल, तेव्हा हे त्यांनी खाऊन घ्यावं. सर्व दलित विद्यार्थ्यांच्या खोलीत एक चांगली दोरीची व्यवस्था करा, यात तुमचे साथीदार मुख्य वॉर्डन यांची मदत घ्या.

       आम्ही पीएचडीचे विद्यार्थी हा टप्पा पार करून चुकलो आहोत, आम्ही दलित स्वाभिमान आंदोलनाचा भाग झालो आहोत, ज्याला तुम्ही बदलू शकत नाही. आम्हाला हे सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नाहीय. यासाठी मी आपल्याला निवेदन करू इच्छितो की, आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना युथेनेसियारखी सुविधा उपलब्ध करून द्यावी.

        मी कामना करतो की, तुम्ही आणि कँपस नेहमी शांततेत राहा.

आपला

- वेमुला रोहित
                                                                

२. रोहित वेमुलाचं अखेरचं पत्र -

                                                                                                                               १७ जानेवारी २०१६
सुप्रभात,

तुम्ही हे पत्र वाचत असाल तेव्हा मी नसेन, रागावू नका, मला माहित आहे, अनेकांना माझी परवा होती, तुम्ही माझ्यावर प्रेम करत होते, आणि माझी काळजीही घेत होते. माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मला नेहमीच माझ्याबद्दल अडचण होती. मी माझा आत्मा आणि शरीर यांच्यात निर्माण झालेली दरी वाढताना पाहतोय. मी एक राक्षस झालो आहे. मी एक लेखक होऊ इच्छीत होतो. विज्ञानावर लिहिणारा, कार्ल सेगन सारखा. अखेरीस आज हे शेवटचं पत्र लिहु शकतोय.


माझं विज्ञानावर प्रेम होतं, ताऱ्यांवर, निसर्गावर, लोकांवरही मी प्रेम केलं, पण हे समजलं नाही, त्यांनी कधी निसर्गाला फारकत दिली. आपल्या भावना दुय्यम दर्जाच्या झाल्या आहेत. आपलं प्रेम नकली आहे, आपल्या मान्यता खोट्या आहे. आपले विचार गांजलेले आहेत. आपल्यातील सर्जनशीलता फक्त कृत्रिम कलेचा आधार घेऊन उभी राहत आहे. वेदना सहन करण्याची तयारी ठेवल्याशिवाय प्रेम करणं शक्यच राहिलेलं नाही.


एका व्यक्तीची किंमत त्याची तत्कालीन ओळख आणि जवळच्या शक्यतेवर मर्यादीत करण्यात आली आहे. एक मतदार म्हणून. माणूस एक आकडा झाला आहे. फक्त एक वस्तू. कधीही माणसाला एक मन असलेली व्यक्ती म्हणून, ग्रहताऱ्यांच्या धुळीतून निर्माण झालेली एक दैदिप्यमान वस्तू म्हणून माणसांचा विचार केला जात नाही. प्रत्येक क्षेत्रात, अभ्यासात, रस्त्यावर, राजकारणात, आणि मरताना नि जगतानाही.


मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं पत्र लिहित आहे, पहिल्यांदा शेवटचं पत्र लिहित आहे, मला माफ करा, जर याचा कोणताही अर्थ निघत असेल.


असं होऊ शकतं की मी चुकीचा असेल, जग समजून घेण्यासाठी, प्रेम, जीवन, यातना आणि मृत्यू समजून घेण्यात. तातडी कसलीच नव्हती. पण मी सतत धावत होतो. बेचैन होतो, जीवन सुरू करण्यासाठी. काही लोकांसाठी आयुष्य हाच गुन्हा ठरतो. माझा जन्म एक जीवघेणा अपघात होता. मी माझ्या बालपणीच्या एकाकीपणातून कधी बाहेरच पडू शकलो नाही. माझ्याच भूतकाळातील एक नावडत मुलं होतो मी.


मी दु:खी नाहीय. मी फक्त रिक्त झालो आहे. मला स्वत:ची चिंता नाही. हे दयनीय आहे, आणि याचचं कारण आहे की मी आत्महत्या करतोय.


लोक मला कदाचीत भेकड म्हणतील, स्वार्थी म्हणतील, मी गेल्यावर मला मुर्खही ठरवतील, मला काहीही फरक पडणार नाही, मला लोक काय म्हणतायत. मेल्यानंतर भूत-प्रेताच्या गोष्टींमध्ये मी विश्वास करत नाही. जर कोणत्या गोष्टीत माझा विश्वास आहे, तर तो म्हणजे, मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेल, आणि जाणून घेऊ शकेल की दुसरं जग कसं आहे.


जर तुम्ही माझं पत्र वाचत असाल, तर माझ्यासाठी एवढंच करा, माझी सात महिन्याची फेलोशीप मिळणे बाकी आहे. १ लाख ७५ हजार रूपये. कृपया ते माझ्या परिवारापर्यंत पोहोचवा. मला रामजी यांना ४० हजार रूपये द्यायचे होते, त्यांनी पैसे कधीच परत मागितले नाहीत. पण कृपया त्यांना फेलोशीपच्या पैशातून पैसे द्या.


माझी इच्छा आहे की, माझी शेवटची प्रेतयात्रा शांततेत निघावी. असं वाटू द्या की मी आलो होतो, आणि निघून गेलो. माझ्यासाठी अश्रू गाळू नका, फक्त एवढं ध्यानात ठेवा, मी आनंदी आहे जगण्यापेक्षा मरणाने.


उमा अन्ना मी हे काम तुमच्या रूममध्ये केलं म्हणून मी माफी मागतो. आंबेडकर स्टुंडंट असोसिएशन परिवार, तुम्हाला सर्वांना निराश करतोय, मला माफ करा. तुम्ही सर्वांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं, सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा!


सर्वांना शेवटचा...


जय भीम!

मी काही औपचारीक गोष्टी लिहिणं विसरलो, मी स्वत:ला संपवतोय, या कृत्यासाठी कुणीही जबाबदार नाहीय.

कुणीही मला असं करण्यासाठी भडकवलेलं नाही, कुणीही असं कृत्य केलेलं नाही, किंवा शब्द वापरले नाहीत, ज्यामुळे मी असं केलं.

हा माझा निर्णय आहे, आणि यासाठी मी जबाबदार आहे. मी गेल्यानंतर माझ्या मित्रांना आणि शत्रुंनाही त्रास देऊ नका.

                                              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई