(टीप १ :या प्रश्नांची मी थोडक्यात आणि सविस्तर अशी दोन उत्तरे दिली आहे. सविस्तर उत्तर जास्त मोठे असल्यामुळे ते वाचायला ज्यांना वेळ नाही अशा वाचकांसाठी थोडक्यात उत्तर दिले आहे. ज्या वाचकांना या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे, अशा वाचकांसाठी सविस्तर उत्तर लिहिले आहे.

टीप २ : श्री रा. चिं. ढेरे यांनी 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. सविस्तर उत्तरात जे पृष्ठ क्रमांक दिले आहेत, ते या पुस्तकातील आहेत.)

थोडक्यात उत्तर : पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही, परंतु महाराष्ट्रातील अवैदिकांनी बौद्ध धर्माला ओहोटी लागल्यावर पंढरपूरच्या विठ्ठलात बुद्ध पाहिला.

सविस्तर उत्तर : श्रीविठ्ठल या लोकप्रिय दैवतावर हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मानी आपला अधिकार सांगितला.

जैनांच्या मते विठ्ठल हा जैनांच्या बावीसावा तीर्थंकर नेमिनाथ आहे असा जैनांचा दावा होता आणि अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत हे मत हिरीरीने मांडले जात होते. परंतु त्यानंतर हळूहळू हे मत मागे पडत गेलेले दिसते.

सर्व संतांनी विठ्ठलाची सांगड श्रीकृष्णाशीच घातली आहे. नामदेव महाराजानी "विटेवरी समचरण सुंदर । बाळ सुकुमार यशोदेचे ।।" असे लिहून विठ्ठल म्हणजे कृष्ण हेच सांगितले आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांनी विठ्ठल हा पुंडलिकाच्या निमित्याने वैकुंठाहून भक्तांचा उद्धार करण्यासाठी आला असे सांगितले आहे. श्री. रा. चिं. ढेरे पुढे लिहितात की, "ही विष्णूच्या विठ्ठलरूपातल्या अवतरणाची कथा ज्ञानोबांपासून सर्व संतांनी परमश्रद्धेने स्वीकारली आहे." (पृष्ठ ४८). ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका लिहिली, 'धम्मपदा'वर नाही. एकनाथांनी भागवतावर टीका लिहिली, विनयपीटीकेवर नाही.

असे जर आहे, तर विठ्ठलाचा संबंध गौतम बुध्दाशी कसा जोडला जातो ? विठ्ठलाची मूर्ती ही मूर्तीशास्त्रातील बुद्धाच्या मूर्तीशी जुळत नाही किंवा विठ्ठलाचे चरित्र आणि बुद्धाचे चरित्र हे सारखे नाही. शब्दकोशात 'बुद्ध' या शब्दाचा अर्थ शहाणा, जागा झालेला, कळलेला असा दिला आहे. अनेक संतांनी विठ्ठलाला 'बुद्ध' म्हटले आहे. पण इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की, त्यांनी गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ म्हटले नाही किंवा विठ्ठल हा बुद्धच आहे, असे त्यांनी म्हटले नाही. संत विठ्ठलाला विष्णूचा नववा अवतार ममानतात. आपण याची काही उदाहरणे पाहूया. जनाबाईच्या अभंगात दशावताराचे वर्णन करताना कृष्णावतारानंतर बुद्धाचे नाव घेतले आहे आणि सांगितले आहे की, "होऊनिया कृष्ण कंस वधीयेला । आता बुद्ध झाला सखा माझा ।।" इथे बुद्ध हा शब्द गौतम बुद्धाच्या संदर्भात वापरला असणे शक्य नाही, कारण त्याने कंसाचा वध केला नव्हता. संत एकनाथांनी लिहिले आहे की, "नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरूप ।। संत तयाद्वारी । तिष्ठताती निरंतरी ।। पुंडलिकासाठी उभा । धन्यधन्य विठ्ठलशोभा ।।". इथे बौद्धरूप हा शब्द गौतम बुद्धाच्या संदर्भात वापरला असणे शक्य नाही, कारण कोणत्याही बुद्धचरित्रात पुंडलिकाच्या उल्लेख नाही. संत नामदेवांनी लिहिले आहे की, "मध्ये झाले मौन देव निजध्यानी । बौद्धय ते म्हणोनि नांवे रूप ।।" यावर रा. चिं. ढेरे यांनी अशी टिप्पणी केली आहे की, "त्यांना 'बौद्ध' शब्दाचा अर्थ ' मौन धारण करून असणारा' असाच अभिप्रेत आहे, हे उघड दिसते." (पृष्ठ २२४) अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही. हे सांगताना रा. चिं. ढेरे लिहितात की, "ज्ञानदेवांपासून निळोबारायांपर्यंत, एवढेच नव्हे तर अगदी दासगणूंंपर्यंत शेकडो मराठी साधुसंत विठ्ठलाला बुद्ध म्हणतात, ते अप्रबुद्धपणामुळे नव्हे. बुद्धाचे मूर्तीविधान आणि विठ्ठलाचे मूर्तीविधान एक आहे, बुद्धाचे चरित्र आणि विठ्ठलाचे चरित्र एक आहे, असे त्यांना मुळीच म्हणायचे नसते. त्यांना बुद्ध विठ्ठलाच्या ठायी समाविष्ट करायचा असतो." (पृष्ठ २४७)

♨️१९३८ साली प्रकाशीत व अद्याप अनुत्तरीत किर्तनकार श्री. चोपडे यांचे "पंढरपुरचा विठोबा" हे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचावे. कोरावर PDF पाठवणे शक्य नसल्याने मी पाठवु शकत नाही. ज्यांना अभ्यासाची जिज्ञासा असेल त्यांनी व्हाॅट्स अॅप क्रमांक अथवा मेल आय् डी मला संदेश केल्यास पाठवता येईल.

♨️विठ्ठल मंदिरातील खांबावर बुद्ध प्रतिमा कोरलेल्या आहेत या बद्दल आपले का म्हणणं आहे ?

👉Budha chi murti nahi ti jain tirthankar chi ahe

♨️अप्रतिम उत्तर. एका शंकेचं निरसन करा. बुद्ध ही पदवी आहे की व्यक्ती? माझ्या मते तरी ती पदवी म्हणून गणली जावी. हा शब्द व्यक्तीवाचक असण्याचं काहीच कारण नाही.

♨️Pan vitthal mandir fakt pandharpurat ka ahe Maharashtra madhe dusre kade mandir nahi

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतांनी तो विष्णुकृष्णरूप मानलेला आहे. पण गंमत म्हणजे श्रुती-स्मृती-पुराणांनी कोठेही विठ्ठलाचा निर्देश केलेला नाही की विष्णुच्या अवतारगणनेत आणि नामगणनेत त्याचा समावेश नाही. मग इसवीसनाच्या अकराव्या-बाराव्या वैष्णवप्रतिष्ठा प्राप्त झालेला हा विठ्ठल आला कोठून?

विठ्ठल आणि पंढरपूर याविषयीचे पौराणिक प्रकृतीचे तीन संस्कृत ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत. त्यातील सर्वात आधीचा ग्रंथ आहे स्कंदपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. दुसरा आहे पद्मपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य' आणि तिसरा आहे विष्णुपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. स्कांद पांडुरंगमाहात्म्य निवृत्ती-ज्ञानदेव आदी संतांच्या उदयापूर्वी, हेमाद्री पंडिताच्या काळापूर्वी रचले गेलेले आहे. त्या ग्रंथामुळे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसांभार दृढ पायावर स्थिर झालेला आहे.

विठ्ठल या नावाची समाधानकारक व्युत्पत्ती अद्याप सांगता आलेली नाही. त्याचे पांडुरंग हे नाव मात्र पंढरपूरपासून तयार झालेले आहे. पंढरपूरचे मूळ कन्नड नाव आहे पंडरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराचा लेख (शके 1159) आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम आणि पांडुरंग-पंढरपूर-पंढरी हे क्षेत्रनाम आणि पुंडरीक हे भक्तनाम कृत्रिम संस्कृतीकरणातून साधले गेले आहे. पुन्हा विठ्ठल या नावाची स्पष्टिकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिल्याची कथा ठोकून देण्यात आलेली आहे.

विठ्ठलाचे पांडुरंग हे संतप्रिय नाव आहे; पण या नावामुळे एक विसंवाद निर्माण झालेला आहे. कारण पांडुरंग हे नाव दृश्‍यतः शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूरगौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक आहे. असे हे नाव सावळ्या विठ्ठलाला देण्यात आले आहे, ही मोठीच गंमत आहे.

संतांनी विठ्ठलाला "कानडा विठ्ठलु कर्नाटकू' असे म्हटलेले आहे. म्हणजे महाराष्ट्राचे हे दैवत कानडी आहे. भौगोलिकदृष्ट्याही यात तथ्य असल्याचे दिसून येते. कारण पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच आहे. पंढरपूर जवळचे मंगळवेढे तर बसवेश्‍वराचे आद्य कार्यक्षेत्र होते. वर सांगितल्याप्रमाणे पंढरपूरचे पुरातन पंडरगे हे नाव पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत आणि त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. या व अशा अन्य काही लहान-सहान बाबींवरून विठ्ठलाचे कानडेपण निःसंदिग्धपणे स्पष्ट होते.

पंढरपूरच्या या कानडी विठ्ठलाचा आद्य भक्त आहे पुंडलिक. जर विठ्ठलाचे मूळ रूप काही वेगळेच होते; तर मग हा पुंडलिक आला कोठून? तर पुंडलिक म्हणजे पुंडरिक. पंडरगे या क्षेत्रनामाच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून पुंडरिक हे नाव सिद्ध झाले आहे. पंढरपूर हे पुंडरिकपूरही आहे. पुंडरिक हा मूळचा पुंडरिकेश्‍वर आहे आणि पंडरगे या गावाचा तोच मूळचा अधिष्ठाता देव आहे. पंढरपुरात विठ्ठलाची विष्णु-कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढविण्याऱ्या वैष्णवांनी, वैष्णव क्षेत्रोपाध्यांनी पंढरपुरातील मूळच्या लोकप्रिय दैवताचे वैष्णवीकरण करून त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट केले. त्यातीलच पुंडरिकेश्‍वर हा देव. त्याला त्यांनी भक्तराज पुंडरिकाचे नवे वैष्णवचरित्र देऊन विष्णुदास बनविले. आज सांगितली जाणारी पुंडलिक कथा ज्ञानेश्‍वरांच्या काळापासून जनमानसाने स्वीकारलेली आहे; पण त्यात काडीमात्र ऐतिहासिकता नाही. ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक अवतरण कथा आहे.

तर विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आजही आले आदिम रूप सांभाळून आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेऊन ते या जोडदेवाची पूजा-अर्चा करतात. बीरप्पा किंवा बिरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा निकटतम सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो. विठ्ठल आणि तिरूमलैचा वेंकटेश या दोघांच्याही उन्नत रूपाचं आदिबीज गोपजनांच्या, गवळी-धनगर-कुरूबांच्या विठ्ठल-बीरप्पा नामक जोडदेवात आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट. बिरोबा अथवा बीरप्पाचे अनेक ठिकाणी वीरभद्रात रूपांतर झालेले आहे. वीरभद्र हा शैव आहे; तर विठ्ठल विष्णु. नरहरी सोनाराच्या कथेत त्याला विठ्ठल मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होते असे दाखविण्यात आले आहे. त्या कथेचा सांधा येथे नीट जुळतो.

विठ्ठल आणि वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णुच्या पुरामप्रसिद्ध रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले आहेत आणि तरीही ते विष्णुरूप पावलेले आहेत. एवढेच नव्हे; तर संपूर्ण दक्षिण भारतात पुरातन विष्णुरूपांहून अधिक लोकप्रियता लाबलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण नावाने ओळखला जातो; तर वेंकटेशाला बालाजी म्हणतात. विठ्ठल-बिरोबा आणि विठ्ठल-वेंकटेश यांच्यातील साम्यही पाहण्यासारखे आहे. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सहन केल्यामुळे तिरूमलैपा,ून पूर्वेस तीन मैलावर वेगळी राहिलेली आहे. वेंकटेशाच्या पत्नाचे नाव पद्मावती; तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे पद्मा. विठ्ठल-बीरप्पाच्या पत्नीचे नाव पदूबाई आहे आणि तीही पतीवर रूसलेली आहे. किंबहुना तीच पंढरपुरात रुक्‍मिणी होऊन प्रकटली आहे, अशी धनगरांची धारणा आहे.

विठ्ठलाला प्रिय असलेला गोपाळकाला; तसेच विठ्ठलभक्त संतांनी रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. काही अभ्यासकांनी गोपाळकाल्याचा संबंध वैदिक "करंभा'शी जोडलेला आहे. करंभ हे खाद्य गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे, कारण "करंभः दधिसक्तवः' असे त्याचे स्पष्टिकरम वेदज्ञांनी दिलेले आहे. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. वैदिक पूषन्‌ देवाला तो खास आवडतो. हा देव वृषभमुखाची काठी हाती धारण करणारा, कांबळे पांघरणारा, गायागुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव आहे. तो अहिंसकही आहे. त्याला दही आणि पीठ आवडते. तर पंढरपूरचा विठ्ठल ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती "ताकपिठ्या विठोबा'च्या रूपाने पाहावयास मिळते.
दुसरी गोष्ट भारूडाची. या शब्दाचा मूळ अर्थ धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड या नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे.

पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता, त्या मार्गावरच येते, हे प्रा. कोसंबी यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे. तिचा वैष्णव विठ्ठलाशी मूळात संबंध नाही.

(संदर्भ ः
विठ्ठल ः एक महासमन्वय - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, प्रथमावृत्ती 1984
An Introduction to the study of Indian History - Prof. D. D. Kosambi)

नाही नाही . हा कोणता तर्क आहे आता .. पढरपूरला भकत पूंडलिकाने जी देवावरची भकती आणि तिचा प्रसार महाराष्ट्रभर केला . त्यावर खूश होवून भगवान श्रीकृष्ण विठठलाच्या रूपात पूडलिकांना भेटायला आला .. विठठलाला पांडूरग पण म्हणतात .. पांडूचा अर्थ कृष्णवणी म्हणजेच सावळा असा होतो .. सावळा रंग असलेला तो पाडूरंग ...पूडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी वीट दिली ... विटेवरी उभा करकटेवरी .आणि महाराष्ट्रातील संत मंडळीनी विठठलाची भक्ती हि कृष्ण या अर्थाने केली आहे.. माझे मतानूसार भगवान बूदधांचा आणि विठ्ठलांचा कोणताच कूठेच संबंध मॅच होत नाही .. आणि पंढरपूरला रुख्मीणी पण आहे .. ज्यावेळी पूंडलिकांची आणि विठठलाचा संवाद म्हणजेच देव आणि भक्तांचा संवाद ऐकू न यावा म्हणून रुख्मीणी दूरच उभी होती .. आणि भगवान बूद्ध हे भारतीय ग्रंथानूसार भगवान विष्णूचा नववा अवतार आहे ..... असे रिलेशन आढळते .. पण दूसरे साम्य आढळतच नाही . आणि सर्वात मोठी गोष्ट बुद्ध हे मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत .. ..... धन्यवाद ....

पंढरपूरचे विठ्ठल हे बुद्ध आहेत की नाही याबद्दल बरीच माहिती इंटरनेट वर आहे आणि मी वाचली सुद्धा आहे पण मला हे कळत नाही की हे जाणून घेऊन नक्की आपण काय करणार किंवा काय करू शकतो?

आज पिढ्यानपिढ्या वारीला जातात, दर्शन घेतात आणि हे सुरूच राहणार आहे तर पांडुरंग बुद्ध असले तरी काही फरक पडणार नाही आणि नसले तरी काही फरक पडणार नाहीये..

विठ्ठल बुद्ध आहेत की नाही या वादात ना अडकता अस करावे की विठ्ठल भक्तांनी त्यात विठ्ठल पहावा आणि बौद्धांनी त्यात बुद्ध पाहावे…

दोघांची पूजा आणि श्रद्धा त्या एकाच मूर्तीसाठी आहे.

साहेब आपण सर्वार्थाने विचार करावा. बुध्द आणि बौध्द चमत्कार मानतच नाही. आणि सबळ पुराव्याशिवाय बाप्फळ गप्पा मारण्याची बौद्धांची परंपरा पण नाही. हा मानवाने निर्माण केलेला धम्म आहे. देवाने नाहीय. सत्य झाकले तरी आज ना उद्या उघडे पडणारच. ज्या संदर्भान्वये तर्क लावताहेत ना ते सर्व चुकीचे आहे. अखंड भारत आधीच बौद्धमय आहे. कितीही डोके बडवले तरीही. विठ्ठल बौद्ध आहे. पांढऱ्या दगडावरची काळी रेघ आहे.

ज्याला वारकरी म्हणवताय तो बौद्धांचा श्रमणपरंपरा आहे.

पंढरपूरचे विठ्ठल हे बुद्ध आहेत की नाही याबद्दल बरीच माहिती इंटरनेट वर आहे आणि मी वाचली सुद्धा आहे पण मला हे कळत नाही की हे जाणून घेऊन नक्की आपण काय करणार किंवा काय करू शकतो?

आज पिढ्यानपिढ्या वारीला जातात, दर्शन घेतात आणि हे सुरूच राहणार आहे तर पांडुरंग बुद्ध असले तरी काही फरक पडणार नाही आणि नसले तरी काही फरक पडणार नाहीये..

विठ्ठल बुद्ध आहेत की नाही या वादात ना अडकता अस करावे की विठ्ठल भक्तांनी त्यात विठ्ठल पहावा आणि बौद्धांनी त्यात बुद्ध पाहावे…

दोघांची पूजा आणि श्रद्धा त्या एकाच मूर्तीसाठी आहे.

नाही . पंढरपूर चे विट्टल हे भगवान श्रीकृष्ण यांचं संपूर्ण भारतातल्या अनेक प्रकट रूपांपैकी एक होय . श्री बुद्ध हे दशावतारामध्ये मोडत नाही असे माझं मत आहे . कारण भगवान महाविष्णू अवतार घेण्याचे काही खास परिस्थिती आणि कारण लागतात .

बुद्ध यांची विषयी असे काही परस्तिती किंवा कारण जुळलेले दिसत नाही .

हे माझं वैयक्तिक मत आहे . इतरांचे मत वेगळे असू शकतात . आणि त्यांच्यापुढे मी नतमस्तक आहे .

जय जय राम कृष्ण हरी .

विठ्ठला पांडुरंगा .

मंदिर बाराव्या का चौदाव्या शतकातले आहे असे पुरातत्व शास्त्राचे म्हणणे आहे। मूर्ती पूजा ही बुद्धा नंतर काही काळाने भारतात चालू झाली। वैष्णव धर्म महायान शाखेतून आला असे म्हणतात।

गौतम बुद्धासारखा सन्यासी कोणत्या मुलखात आपल्या पत्नीसोबत पुजला गेला असेल असे मलातरी वाटत नाही , माझ्या माहितीनुसार विठ्ठल हे श्रीकृष्ण .

पंढरपुरातील मंदिरातील मूर्ती एकटी आहे, सोबत कोणी हि स्त्री नाही, रुक्मिणीचे मंदिर वेगळे आहे, हे ध्यानात असू द्या!!!

होय पण मुद्रा बुद्धांची नाही हे ही बघावे

तेथे प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करा ! तुमच्या लिहिण्यावरून असे म्हटले जाऊ शकते कि तुम्ही पंढरपूरच्या मंदिराला कधीच भेट दिलेली नाही!

भेट दिली काय आणि नाही काय , गौतम बुद्ध कमरेवर हात ठेवून उभे थोडीच राहिलेले दिसणार आहेत!

आपण टाकलेल्या या चित्रातील डावी मूर्ती मुकुट व राजवस्त्र परिधान केलेली जाणवते व अश्या मूर्त्या तर तत्कालीन व दक्षिणेकडिल राज्यांच्या पण असायच्या

हि मूर्ती मध्य प्रदेशातील आहे!

मुकुट आणि राजवस्त्र?

मूर्ती अशोककालीन आहे, शिल्पकारास आता विचाराने शक्य नाही! त्या वेगवेगळ्या मुद्रेतील खूप मुर्त्या आहेत, इतर मुर्त्या बघितल्या नसल्याने, बुद्ध म्हटले कि आपल्यासमोर ध्यानस्थ बसलेली मूर्तीच येते.

म्हणूनच प्रश्न पडलाय की बुद्ध की इतर कोणता सत्ताधीश , कारण शुंग कालीन राजघराण्यातील लोकांच्यामुर्त्या आहेत आपल्याकडे. शुंग व मौर्य काळातील अंतरच किती 


Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई