विठ्ठल मंदिर कोणी बांधले?


पंढरपूरचे मूळ श्री विठ्ठल मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले. पंढरपुरातील शके ११११ (सन ११८९) मधील कोरीव लेखावरून असे दिसते की, 

राजा भिल्लम यादव,

महाजन

देवाचे भक्तगण आणि 

मुद्रहस्त विठ्ठलदेव नायक या 

सर्वांनी एक लहान देऊळ शके ११११ मध्ये बांधले.

(संदर्भ : श्रीविठ्ठल : एक महासमन्वय : लेखक रा. चिं. ढेरे : पृष्ठ ४०२)

सेऊण यादव (देवगिरीचे यादव) आणि होयसाळ यादव ही दोन्ही घराणी श्री विठ्ठलाचे भक्त होती. 

होयसाळ यादवांपैकी वीर सोमेश्वर याने शके ११५९ (सन १२३७) मध्ये कर्नाटकातील एक गाव देवळाला दान दिला, अशी नोंद आहे.

शके ११९५ (सन १२७३) मध्ये देवगिरीचा श्री रामचंद्रदेवराय यादव व त्याचा करणधिप हेमाद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन मंदिराचा विस्तार केला आणि त्याला साजेशी व्यवस्था लावून दिली.

Comments

Popular posts from this blog

मराठय़ांचे प्राचीनत्व ९६ कुळी म्हणजे काय आहे?

The History of India

जरीआई – मरीआई