भगवान विट्ठल व रूकमाई मातेची मूर्ती कर्नाटक मधील हंपी येथून आणली असे मानतात. हे खरे आहे का?
आपण एक लक्षात घ्यायला हवं. बौद्ध लोक विठ्ठलाला बुध्दाचे मानतात. बुध्दच मानतात. बरेच जण विठ्ठलाला महारनाथ पण मानतात. आणि तो महारनाथच आहे.
आजकाल क्वोरावर पु.लचा एक डायलॉग फिरवला जातोय. त्याच पु.ल ची भूमिका असलेला झाला महार पंढरीनाथ या गाण्याचा अर्थ काय होतो.
मात्र तो मुळातच महार असताना...झाला महार पंढरीनाथ म्हणून विठ्ठल सर्वजातिय असल्याचा बनाव केला जातोय. मुळात इतिहास संशोधन करणारे, स्वयंघोषित अध्यात्माचे, धर्माचे ठेकेदार यांनी स्वार्थाने महारनाथाचे पंढरीनाथ जरी केले तरी अर्थ बदलतच नाही.
ज्या अठरापगड जाती म्हणताहेत ना त्या महार, मातंग यांच्या पोटजाती आहेत. तेच इथली शासनकर्ती जमात आहे. हेच क्षत्रिय आहेत.
पंढरपुर हा पुर्वी कर्नाटकातील भाग होता. महाराष्ट्रा नव्हेच. या भागात बहुसंख्य लोक महारलोक होते आणि आहेत.
हेमाद्रीने कोणत्याही मंदिराचे नवनिर्माण केले नाही. मात्र बहुसंख्य असलेला बहुजन लोकांचे श्रध्दा क्षेत्राचे जिर्णोध्दार करण्याच्या बहाण्याने मंदिरीकरण केले.शके ११११ मधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमान करता येते की शके ११११ मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले. 'स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते.हा 'लानमडू' हळूहळू वाढत गेला.
मुळात संस्कृतकरण, संस्कृतीकरण केल्याने महाराचे ब्राम्हणीकरण केलेले भारताच्या इतिहासाला नविन नाहीय. नाग,वानर, द्रविड हेच येथिल मुळवंशज.
११ व्या१२ शतकातला पंढरीनाथाचा १५ व्या१६ शतकापर्यंत महारनाथच म्हणून ओळख आहे. संत एकनाथ यांचे ब्राम्हणीपणाच्या आड त्यांचे नाव वापरून १९ व्या शतकात विठ्ठलाचे पध्दतशीरपणे ब्राम्हणीकरण केले.
इथल्या बहुजनांना मुस्लिम शासकांची भिती नव्हतीच. तेवढी या ब्राम्हणीशाहीपासून अजूनही आहे. मुस्लिम जुलूमांचे वाजवीपेक्षा जास्त क्रूरपणा दाखविणारे हेच परंतु त्यांच्या दरबारात अढळ स्थान प्राप्त करणारे बहुसंख्येने हेच यावरून लक्षात घेतले पाहिजे.
हे निजाम मोगल यांनी पुरातन मंदिरे फक्त तिथल्या तिजोरी पोटीच लुटली. जिथे कांहीच हाती नाही लागले तिथे विध्वंस केला हे मान्य करू. परंतू याच मानसिकतेतून जी धारणा पक्की झाली की मुस्लिम म्हणजेच मुर्तिभंजक त्याचा पुरेपुर फायदा याच लोकांनी घेतला.
विठ्ठल मंदिराचा आणि महात्मा चक्रधर यांचा कार्यकाल एक आहे. नामसादृश्य पणामुळे इतिहासाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
महानुभाव पंथ हा जैन बौद्ध विचारांचा होता. आहे. दिगंबर अवस्थेतले चक्रधर यांचे गुरू कोणीच नाहीत. परंतू समाजप्रबोधन, समाजसंघटन, समाजजागरण करणाऱ्या व्यक्तींचे या धर्मांधांनी अक्षरशः हत्या केली. नरसंहार केला. जो अनिष्ट कर्मकांडांच्या विरोधात, वाईट चालीरितींच्या विरोधात आवाज उठविल त्यांचीच पुर्वीही हत्या केलेल्या आहेत.
महानुभाव पंथ हा या धर्मांधाच्या विरोधातील फार मोठी प्रतिक्रांती होती. लोकचळवळ होती. ब्राम्हणीकरणाने या चळवळीला वाळवी लावली. देवाचंच घ्यायचं आणि देवाला लावायचं या वृत्तीचे लोक बाजार करायला लागले. बहुजनांला चमत्काराच्या बातां मारू लागले... भिकाऱ्यांतला स्टँण्डर्ड भिकारी म्हणजेच पुजारी लोकांनी बहुजनांला गोचिडागत रक्तशोषून घेतलं.
महानुभावी ( महा+ अनुभवी) संतपरंपरेला शैव, वैष्णव परंपराही कुटनिती केली गेली. संताच्या साहित्यातला बौद्धाचा उल्लेख योगायोग नाहीचय. ते बौद्ध तत्वज्ञानीच आहेत.
भगवद्गितेवरील टिकाग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहीली. त्याचे शुध्दीकरण करण्याच्या नावाखाली स्तुती पुराणे लिहीणारी मनोरुग्णवृत्ती समजायला हवी. गाथा हा शब्दच बुध्दीष्ट आहे. निर्वाण हा शब्द बुद्धिष्ट आहे. मात्र बुद्धांचे तत्वज्ञान ओबीबद्ध केलेली तुकारामांची अभंगगाथा त्यांच्यापश्चात त्यांचे नावे लिहिली जावी. मुळ रचनेचेही मोठया प्रमाणावर , आपल्या सोईनुसार संस्करण करुन लिहीली गेलीय कळत नाहीय काय? असे एक नाही अनेक उदाहरणे आहेत.
दक्षिणपथ बहुसंख्य भाग हा द्रविडी आहे. आणि द्रविडी कोणास म्हणतात ठाऊक असेलच की.
देवगिरीच्या राजांचे म्हणजेच यादवांचे अराध्यदैवत, कुळदैवत म्हणजेच विठ्ठल. परंतू विठ्ठल हा वीरगळ आहे असे कांहीचे मत आहे. वीरगळ याचे निकष आता जे लावतात तेच मुळात चुकीचे आहेत. अडीज तीन फुटांचा तीन चौकटी असलेला वीरंगळ अशीच संकल्पना इतिहास संशोधकांच्यामध्ये रुढ झालेली आहे. आणि यालाच प्रमाण मानतात.
ग्रीकमध्ये राजांचे अस्थी, अवशेष ( मम्मीज्) साठी पिरॅमिड आहेत. तसेच भारतात बौध्द स्तुफ आहेत. मंदिर म्हणजे तरी काय जन्म मृत्यूसंबंधी आठवण. एक प्रकारची समाधीच असते की.
मुर्ति म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिकृती असते.
देवगिरीचे यादव यांचेच वंशातील राजाची समाधी म्हणजेच विठ्ठल मंदिर आहे. विजयनगर येथिल हंपी ठिकाणी बौद्धमंदिर सम्राट अशोककालिन आहे. विजयनगर हे बौद्ध साम्राज्य कर्नाटकातील बेल्लोरी जिल्हयातील. हंपी ही विजयनगरची राजधानी होती.
मुळ तिथेच विठोबा आहे.
याच मंदिरातील सध्याची मुर्ती आहे. असे मानले जाते.. आणि ती बौद्ध मंदिरे उजाड झाल्याने पुनर्वसित केली ती देवगिरीच्या यादवांनी. कारण यादव हेच बौद्धवंशीय आहेत. मुळात बौद्धवंश म्हटले तरी भोवया उंचावतात. जगातला प्रत्येकजण हा बुद्धीवंत,आहेच हे मान्य केले की या बुध्दीवान मानसाला ज्याला थोतांड, चमत्कार, अंधश्रध्दा बिलकुल चालत नाही तोच जैनादी बुध्द हे माझं मत.
यादव हे अहिर समाजाचे ... आता अहिर कोण हेच कळत नसल्याने आणि ज्याने त्याने सोईचा राजकारणी अर्थ लावल्याने संभ्रम केला तरी होत नाही असा स्पष्ट आहे. तो शोधा म्हणजे सापडेल.
मुर्त्यांची तस्करी पुर्वीपासून ते आजतागायत होतेच आहे.जी मुर्ति विनासायास काढता येत असे.ती तोडली जातच नव्हती. मुळात जी मुर्ती फुटलेल्या दिसतात त्या मुर्ती तस्करीतूनच काढताना फुटल्या... नंतर विकृतीतून.. पुर्व व्देषातून जाणूनबुजून फोडण्यात आल्यात. असे मला वाटते.
देवगिरीचे यादव, विजयनगरशीच म्हणजे हंपीशी संबंधीत आहेत. बौद्धधम्माशी संबंधीत आहेत. त्यामुळे सदरील मुर्ति ही हंपीतीलच आहे. असं माझं स्पष्ट मत आहे.
तत्कालिन साधू संत यांना पुर्वेइतिहास माहिती असल्याने सर्वांनी या महाअनुभवाचे नव्या पंथाचे स्वागत केले. हा बहुजन, शोषित, पिडीत, दलित, पददलित , अस्पृश्य म्हणून पेशवाईने ठरविलेल्या लोकांचा महारनाथच आहे.पंढरीनाथच .आहे.
छान उतर दिले सर👍😄😄💐💐👍👍🙏🙏👌👌
Comments
Post a Comment